कर्जोद येथे मौलाना आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त पुरस्कार सोहळा

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कर्जोद येथील नियोजित शादी हॉल येथे नुकतेच मौलाना आझाद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मौलाना आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वर्षीचा ‘मता ए खानदेश पुरस्कार’ इकरा सोसायटीचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्याबरोबर रफीक अहमद यांन (मीसाली अदीब), व काजी मोहम्मद अनीस यांना वकार ए कलम, इमरान खान मीसाली शहाफी, मो.रफीक शेर मोहम्मद मिसाली मौल्लिफ, अ.रहेमान साकिब मिसाली शायर, अन्सारी मो. तव्वाब मीसाली सहाफी,निलेश बापु महाले उत्कृष्ठ पत्रकार,असगर सै. तुकडू जिल्हा रतन,हकीम आर.चौधरी आदर्श गौरव, भारत शिवाजी कुंवर आदर्श समाजसेवक,हाजी जाकीर कुरैशी समाज रतन, मोहसीन अजीज खान समाज रत्न,वसीम शे. गफ्फार समाज रत्न, इमरान अमानुल्ला खान समाज रत्न, संजय काशीनाथ चौधरी समाज रत्न, राजु भागवत सवर्णे समाज रत्न,फिरोज सिकंदर खान आदर्श रत्न,महेमुद मन्यार आदर्श समाजसेवक, राजु तुकाराम बोरसे कला रत्न,ताजोद्दीन शे. कासम क्रीडा रत्न,भाउसाहेब पाटील आदर्श समाजसेवक, मो.अबरार फखरे दरुस्सुरुर, नबी शे. गनी आदर्श शिक्षक, डॉ.हनीफ शेख आदर्श आरोग्य रत्न, शाहीर प्रसुराम सूर्यवंशी कलारत्न शे.रईस न्याजमोहम्मद आदर्श शिक्षक,सईद शे. ताहेर आदर्श शिक्षक,विलास सुरेश कोळी आदर्श आरोग्यसेवक, परवीन बी शकील खान आदर्श सरपंच,अकील महेताब शेख आदर्श समाजसेवक,नंदलाल रतन बेलदार आदर्श समाजसेवक, नफीसा बानो आदर्श शिक्षिका, नाजेमा परविन शेख आदर्श शिक्षिका,भिका सोमा सपकाळे आदर्श शिक्षक, निकहत अंजुम आदर्श रत्न, काजीमोद्दीन सै.रफीक आदर्श शिक्षक,प्रकाश रमेश पाटील आदर्श आरोग्यसेवक, मदहत फुरकान आदर्श शिक्षिका, हनीफ शे. सत्तार आदर्श शिक्षक, मलक शाकीर आदर्श समाजसेवक, विनोद भिमराव अडकमोल आदर्श समाजसेवक, शाहीर भाउसाहेब सुर्यवंशी कलारत्न, सईद अहमद जहान अली आदर्श मुख्यद्यापक, राजेश डिगंबर जाधव आदर्श शिक्षक,वसीम खान पठान आदर्श शिक्षक,जहीर खान साबीर खान यांना आदर्श ग्रंथपाल म्हणून सम्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की, व्यक्तीला मिळालेल्या पुरस्कारामुळे समाजात चांगल्या गोष्टीचा पायंडा पाडला जातो. स्वतःच्या कष्टामुळे व कौशल्यामुळे मिळालेला पुरस्कार म्हणजे समाजाकडून पाठीवर मिळालेली थाप आहे. तसेच इतरांच्या मनात त्यापासून उर्मी निर्माण होते. काम करण्याची आत्मशक्ती आणखी वाढते. हाच जीवनाचा खरा आदर्श आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील,रावेर नगरीचे माजी नगरध्यक्ष दारामोहंमद जफरमोहंमद,हरीश गणवानी,डॉ राजेंद्र पाटील, सोपान पाटील,मोहसीन अशिफ खान, हाजी अनीस, हाजी हारून शेठ,युसूफ खान, ग्यास काजी, भाग्यश्री पाठक सादिक मेंबर, एड सय्यद उपस्थित होते. कामिल शकील शेख यांनी प्रास्ताविक केले. रईस अलाउद्दीन यांनी सूत्रसंचालन केले. हाजी सरफराज,आशिष पाठक,शब्बीर मिस्त्री,एम कैफ,अब्दुल लतीफ आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Protected Content