पुणे (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थेमार्फत तसेच हिंदवी स्वराज्य महासंघ यांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील तमाम सरदार घराण्यातील दुर्मिळ व मौल्यवान अशा शस्त्रांचे प्रदर्शन पुणे येथील बालगंधर्व कलादालनात दिनांक २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान भरवण्यात आले होते. या शस्त्रागार प्रदर्शनास नागरिकांचा भव्य प्रतिसाद मिळाला.
या शस्त्रागार प्रदर्शनात तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे शस्त्र, भांडे, मौल्यवान वस्तू ठेवण्यात आले असून या शस्त्र प्रदर्शनात महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. इतिहास व शस्त्र प्रेमी नागरीक यांनी शस्त्र पाहून अभ्यासण्यासाठी गर्दी केली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 नोव्हेंबर रोजी अनेक सरदार घराण्यातील वंशज व सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या सर्व कलाकारांसह करण्यात आले. या प्रदर्शनात सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे व सरदार घराण्यातील वंशजांनी उपस्थितांना प्रदर्शन आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली. हिंदवी स्वराज्य संघाच्या माध्यमातून सरसेनापती सत्यशिल राजे दाभाडे यांनी पुढाकार घेऊन सरदार घराण्यांशी संपर्क करून प्रदर्शनाच्या आयोजनात मोठे योगदान दिले.
“न भूतो न भविष्यति” अशा या प्रदर्शनात ज्या प्रमुख घराण्यांनी त्यांचा सहभाग दिला आहे. त्यात सरदार सोमाजीराव गरूड,सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर, सरदार साबूसिंग पवार,श्रीमंत सिध्दोजीराजे देसाई, निंबाळकर (निपाणी), सरखेल कान्होजीराजे आंग्रे,सरसेनापती खंडेराव दाभाडे,सरदार इब्राहिम खान गारदी, सरदार राऊतराव ढमाले, देशमुख वीर मुरारबाजी देशपांडे (पोतनीस), सरदार अंताजी माणकेश्वर गंधे, सरदार कान्होजी नाईक, जेधे देशमुख, सरसेनापती येसाजीराजे कंक,सरदार बाळाजीपंत नातू, सरदार कृष्णाजीराजे नाईक, बांदल देशमुख,श्रीमंत एकोजीराव शिरोळे, सरदार पिलाजीराव राजे शिर्के, सरसेनापती हंसाजीराव मोहिते (हंबीरराव), सरसेनापती संताजीराव घोरपडे, सरसेनापती धनाजीराव जाधवराव,विजय वीर मानाजीराव पायगुडे, सरदार पिलाजीराव राजजी सणस यांचा समावेश होता. तर प्रदर्शन ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष दिलीप घोरपडे, माजी अध्यक्ष गणेश रघुवीर, सचिव गणेश खुटवड, हरिश्चंद्र बागडे, सागर माने, कैलास ओहळकर, गौरव शेवाळे, सिद्धेश कानडे, शुभम चव्हाण, दिगंबर शिर्के, ज्योति शेंडे, नागेश जाधव, विवेक रणदिवे, हेमंत भोईटे, प्रतीक पाटील, विशाल सुरतवाला यांनी येणाऱ्या प्रदर्शनार्थींचे स्वागत केले.