नशिराबाद येथे घराला लागली भीषण आग, लाखोंचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद येथील साथी बाजार परिसरात 21 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुधाकर नांदुरकर यांच्या घराजवळ असलेल्या बांधकाम साहित्याला मोठा फटका बसला असून, सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या बांधकाम पाट्या आणि लाकूड जळून खाक झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने, आग वेळीच विझवण्यात आल्याने आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान टळले. अन्यथा, आगीचा भडका उडाल्यास शेजारील घरेही जळून खाक झाली असती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Protected Content