यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोर गावातील खळ्यात अचानक भीषण आग लागली असून या आगीत म्हशीच्या तीन पारडूचा मृत्यु तर ४ पारडू गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, यात शेतीप्रयोगी वस्तू देखील खाक झाल्या असून तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील युवराज गणपत भिरुड यांच्या गावाजवळील खळ्यात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक भिषण आग लागली.या आगीमध्ये त्यांच्या खळ्यातील शेती उपयोगी सामान यात कडबा,कुट्टी जळून खाक झाले तर नऊ पशुधनापैकी अडीच ते तीन वर्षांचे तीन म्हशीची पारडुचा होरपळून मृत्यू झाला तर चार म्हशीचे पारडू गंभीर स्वरूपात जळाले असुन,दोन गाईं देखील जखमी झालेल्या आहेत.सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास खळ्याशेजारी रहिवासी असणारे चिंधु अवचित पाटील यांना या खळ्याजवळ धूर दिसला त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता आग लागलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले यावेळी विजय जंगले व चिंधु पाटील यांच्या आग लागलेली असल्याचे लक्षात येताच जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे गावातील लोक तात्काळ त्या ठिकाणी मोठया संख्येत जमा झाले एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत खळ्यातील शेतीपयोगी सामान यामध्ये कडबा,कुट्टी हे जळून खाक झाले तसेच तीन म्हशीचे पारडुंचा मृत्यू झाला व चार म्हशीचे पारडू गंभीर जळालेले असून दोन गायीसुद्धा आगीमध्ये जखमी झालेले आहेत.
घटनेची माहिती समजताच तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. घटनास्थळी सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी, ग्राम विकास अधिकारी सी.जी.पवार, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.सी.भगुरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ.के.डी. बावस्कर,डॉ.सुरेश सोनवणे, लोटू धनगर,ग्राम पंचायत सदस्य मनोहर ईच्छाराम महाजन,जुम्मा तडवी,कोतवाल विजय आढाळे,ग्राम पंचायतचे कर्मचारी प्रदीप पाटील कलेश कोल्हे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.