जळगाव, प्रतिनिधी | सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ यांच्या वतीने सीमेवरील तसेच सैनिक व विविध सुरक्षा बल यांच्या जीवन रक्षणासाठी व त्यांना बळ मिळावे यासाठी ‘सामूहिक महामृत्युंजय जप भारतीय सेनेच्या स्वसंरक्षणासाठी’ या उपक्रमांतर्गत करण्यात आला.
गोलाणी मार्केट जवळील श्री हनुमान, दत्त व महादेव मंदिरात नवीपेठेतील सैन्य दलात कार्यरत असलेले व सध्या सुट्टीवर आलेले गिरीश भागवत चौधरी व त्यांच्या पत्नी विजया गिरीश चौधरी यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले व जप संकल्प घेऊन कार्यक्रम काय सुरुवात झाली. यावेळी मेजर डॉ. भूपेंद्र सोळंकी यांचा परिवार उपस्थित होता. कार्यक्रमासाठी महामंडळाच्या अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, विजय जोशी, सुरज दायमा, भूषण शिंपी, राजेश तिवारी, दीपक तायडे, दीपक जोशी, दिनेश जगताप, जितू बारी, कुणाल मेटकर, सुरेश सोनवणे धनंजय चौधरी विनय बाहेती, दीपक ओझा विजय सारस्वत आदी उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. चव्हाण धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावाचे आहेत. चंदू चव्हाण यांनी २९ सप्टेंबर २०१६ साली चुकून एलओसी पार करून ते पाकिस्तानात गेले होते. याच दिवशी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. चार महिने पाकिस्तानच्या कैदेत राहिल्यानतंर चव्हाण यांची सुटका करण्यात आली होती.