इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची प्रतिबंधात्मक तुरुंगवासातून सुटका केली आहे. यामुळे पाकिस्तान पुन्हा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची माहिती समोर आली आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह अन्य एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची तुरुंगातून गुपचूप सुटका केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात सरकारला माहिती दिली आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्याविरोधात पाकिस्तान येणाऱ्या काळात सियालकोट-जम्मू आणि राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत आहे.