फैजपूर (प्रतिनिधी)। येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) पंढरीनाथ निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
कारखाना प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण करत असताना निकम यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये हंगाम सुरू होण्याआधी कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. हंगाम संपल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. हा राजीनामा शनिवारी चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती कारखाना सूत्रांनी दिली.