यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी पासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या फॉरेस्ट नाक्याजवळ एका पादचाऱ्यास मारूती व्हॅनने उडविले असून यात पादचारीचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रथम अक्स्मात मृत्युची नोंद करण्यात येवुन नंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, दि. १५ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास डांभुर्णी ते जळगाव मार्गावर कोळन्हावी शिवारातील फॉरेस्ट नाक्याजवळ अरूण दगडु सोळुंके यांच्या शेताजवळ योगेश जनार्दन साळुंके (वय२८ वर्ष) राहणार कोळन्हावी हे आपले आई वडील व कुटुंबासोबत एका रिक्षातून उतरून जात असतांना त्याच वेळेस डांभुर्णी गावाकडुन जळगावकडे जाणारे मारूती व्हॅन हे वाहन क्रमांक१९सिजे २२४६यावरील वाहनचालक धिरज राजाराम पाटील राहणारआव्हाणे जिल्हा जळगाव याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अविचाराने हयगई न करता भरघाव वेगाने वाहन चालुन योगेश साळुंके यांना ठोस मारून त्यास त्याच अवस्थेत गाडी सोबत ओढत नेले व अपघात स्थळावरून पळ काढला.
यावेळी गावातील काही मंडळीनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो काही किलो मिटर अंतरावर त्याच्या ताब्यातील मारूती व्हॅन गाडी सोडुन व पलटी करून फरार होण्यात यशस्वी झाला. गावातील मंडळींनी योगेश सोळंके यास डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ उपचारासाठी जळगावच्या सामान्य रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. प्रथम जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. नंतर दिनांक २४ जानेवारीस जळगाव हुन यावल येथे गुन्हा वर्ग झाल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५ भादवी कलम ३०४ ( अ ) २७९ , ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ , १३४ , (१ )प्रमाणे अपघातास कारणीभुत वाहनचालक धिरज राजाराम पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .