Home क्राईम पैशांसाठी मारहाण करत विवाहितेचा छळ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

पैशांसाठी मारहाण करत विवाहितेचा छळ; शहर पोलिसात गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शाहूनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी मालेगाव येथे पैशांसाठी छळ करत शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहूनगर येथील बाहेर असलेल्या शगुप्ताबी अशपाक शहा (वय 26) यांचा विवाह मालेगाव येथील अशपाक शहा शकील शहा यांच्यासोबत रितीरिवानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी विवाहितेला 1 लाख रुपये माहेराहून आणावे या मागणीसाठी त्यांचा छळ करण्यात आला. त्यानंतर पैसे आणले नाही म्हणून त्यांना मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती अशपाक शहा शकील शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित भदाणे करीत आहे.


Protected Content

Play sound