Home क्राईम ४० लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

४० लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील माहेर असलेल्या एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेराहून ४० लाख रुपये आणावे, या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदूअण्णा नगरातील रहिवासी कविता रुपेश पाटील (वय २६) यांचा विवाह गुजरात पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या रुपेश गोपाल पाटील यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व सुरळीत होते. मात्र, त्यानंतर सासरच्यांकडून तिला माहेराहून ४० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येऊ लागली. विवाहितेने ही रक्कम आणण्यास असमर्थता दर्शविल्याने, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू करण्यात आला. पती रुपेश याने तिला त्रास दिलाच, शिवाय सासू वंदना गोपाल पाटील आणि सासरे गोपाल भिका पाटील यांनी देखील अपमानस्पद वागणूक दिली.

या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहिता कविता आपल्या माहेरी निघून आली. त्यानंतर तिने जळगाव तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पती रुपेश गोपाल पाटील, सासू वंदना गोपाल पाटील आणि सासरे गोपाल भिका पाटील (सर्व रा. गुजरात पेट्रोल पंप, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ श्रीकांत बदर करत आहेत.


Protected Content

Play sound