Home क्राईम पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
123


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोहर्डे येथे माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी एका २० वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पती, सासू, सासऱ्यासह एकूण आठ जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा विवाह नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथे झाला असून, तिला एक लहान मुलगाही आहे. लग्नानंतर काही काळाने पती तिच्याकडे वारंवार भाजीपाला व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपयांची मागणी करू लागला. पतीच्या या मागणीला सासरच्या इतर मंडळींनीही साथ दिली.

पैसे आणण्यास नकार दिल्यावर सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. छळाचा कळस गाठत त्यांनी तिला व तिच्या लहान मुलाला घरातून बाहेर काढले. या त्रासाला कंटाळून अखेर तिने रावेर पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत पती, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Protected Content

Play sound