पारोळा प्रतिनिधी । घरात एकटी असतांना विवाहिता घर सोडून गेली आहे. याप्रकरणी तिचा पतीने दिलेल्या फिर्यादी वरून ती हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहराच्या म्हसवे शिवारातील दुर्गा पेट्रोल पंप मागील रहिवाशी घनश्याम भालचंद्र पाटील हा युवक आपल्या कुटुंबासह राहतो. चार महिन्यापूर्वी त्याचे जयश्री (वय 22) हिच्याशी विवाह झाला आहे. 10 डिसेंबर रोजी तो व वडील हे कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. तर त्याची आई 15 दिवस पासून बहिणी कडे गेली होती. पत्नी जयश्री ही घरी एकटीच होती. सायंकाळी ते कामावरून घरी परतले असता पत्नी जयश्री ही घरात मिळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. परिणामी घनश्याम याच्या फिर्याद वरून पत्नी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.