यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कासारखेडा येथील ३३ वर्षीय विवाहिता जळगाव येथे जात असल्याचे सांगून ८ दिवसांपासून बेपत्त झाल्या आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
सोनी अमित पाटील (वय-३३) रा. कासारखेडा ता.यावल जि. जळगाव असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, सोनी पाटील ह्या पती व तीन मुलांसह वस्तव्याला आहे. पती अमित हे नोकरी निमित्त दुबई येथे गेल्याने सोनी पाटील ही माहेरी आई प्रमिलाबाई तोताराम पारधे यांच्यासह वास्तव्याला आहे. २८ मार्च रोजी सोनी पाटील हिने मुलांसाठी कपडे घेण्यासाठी जळगाव येथे जात असल्याचे सांगून घरातून बेपत्ता झाल्या होत्या. रात्री उशीरा त्या घरी न असल्याने त्यांची आई प्रमिलाबाई आणि इतर नातेवाईकांना तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू विवाहिता ह्या कोठेही आढळून आल्या नसल्याने विवाहितेची आई प्रमिलाबाई यांनी मंगळवारी ५ एप्रिल रोजी यावल पोलीसात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात मंगळवार ५ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज हमीद शेख करीत आहे.