यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २८ वर्षीय विवाहिता तीन दिवसांपासून माहेरी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती योगेश नेमाडे (वय-२८) या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच मिळून न आल्या नाही. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. किशोर परदेशी करीत आहे.