भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेची इन्स्टाग्राम, फेसबुकवर बनावट खाते तयार करुन त्यावरुन महिलेचे फोटो व्हायरल करुन बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार, ७ मे जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहित महिला वास्तव्यास आहे. विवाहितेचे वेगवेगळया नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. तसेच महिलेचे फोटोचा वापर करुन खाते तयार केले तसेच फोटो व्हायरल केले. १६ डिसेंबर २०२१ पासून अशाच पध्दतीने अज्ञात व्यक्तीने महिलेचे बनावट खाते तयार करुन त्यावरुन फोटो व्हायरल करत तिची बदनामी केली. ६ मे २०२२ रोजी प्रकार महिलेच्या लक्षात आल्याने तिने याबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शनिवार, ७ मे रोजी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.