जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागातील ३० वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. दरम्यान १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारा संशयीत आरोपी जितेंद्र बच्छाव (पूर्ण नाव माहीत नाही) हा याने महिला दळण काढण्यासाठी घराबाहेर जात असताना तिचे केस पकडून तिचा मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिच्या विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विवाहितेच्या पतीला शिवीगाळ केली व “तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही जास्त बोलले तर मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची गाडी फोडून टाकेल, अशी धमकी दिली. या संदर्भात महिलेने पतीसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र बच्छाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी भेट दिली. या घटनेतील संशयित आरोपी जितेंद्र बच्छाव याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील यांनी केली.