जळगावात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

death penalty hanging
जळगाव प्रतिनिधी । घरात कोणी नसताना वरच्या मजल्यावरील स्वयंपाकघरात ओढणीने गळफास घेऊन विवहितेने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

 

याबाबत माहिती अशी की सुवर्णा किंकर घाटा (वय 31, रा. भोईटे गडी, राममंदिराजवळ) यांनी सोमवारी १८ रोजी रात्री ११.४५ दुमजली इमारतीच्या वरच्या घरातील छताच्या कळीला ओढणीने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मृत्यू संशयास्पद असल्याचे नातेवाईकांकडून बोलले जात होते. याप्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. पुढील तपास पो.हे.कॉ. किरण पाठक हे करीत आहे.

Protected Content