सावदा, प्रतिनिधी | येथील श्री. आ. गं. हायस्कूल व श्री. ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मार्केटिंग स्कील निर्माण होऊन भविष्यात उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी मल्टी स्केलस या ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी ‘खाना खजाना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी व ११वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
व्हीटी राहुल परदेशी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आई, मोठ्या भावाच्या किंवा मोठ्या बहिणीच्या मदतीने एक चविष्ट आणि रुचकर करून आणत ‘खाना खजाना’ च्या नावाने स्टॉल लावला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे धडे देण्यात आले. सर्व शिक्षक शिक्षिका आणि अनेक विद्यार्थी यांनी या पदार्थांची लज्जत चाखून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यात ८ वीतील अतुल दिलीप बार्हे (शिरा), मोहित समाधान सोनवणे (बटाटा पुरी), हेमंत सुनिल रुले (उसळ). ९ वीतील सतीश नागेश चव्हाण (लिट्टी चोखा), ईश्वर नाथाजोगी (गुलाबजाम), सोहन विजय हिवरे (पुलाव), हेमंत बाबुराव दळवी (भाजी व एळनी), हरिष सुरेशराज माणेकर (फ्रुट सलाड), निलेश हेमंत पाचपांडे (पांढरे ढोकळे), वेदांत नीलकंठ भंगाळे (ढोकळे), पियुष राजेंद्र मेथाडकर (पुरी चाट), रोहन लीलाधर ठोसर (छोले पुरी), संकेत प्रदीप पाटील (ढोकळा), उज्ज्वल सतीश लोखंडे (ईडली), पराग दीपक चौधरी (पोहे). इयत्ता १० वी विशाल माधव कदम (सुजी आलू बॉल ), ११वी कोहिनुर गणेश नाथाजोगी इयत्ता (शेंगदाणे लाडू) यांनी विक्रीसाठी पदार्थ मांडले होते. हरिष सुरेशराज मानेकर हा प्रथम, पियुष राजेंद्र मेथाडकर(द्वितीय), विशाल माधव कदम ( तृतीय), मोहित समाधान सोनवणे (चतुर्थ), सोहन विजय हिवरे (पाचव) क्रमांक पटकविला. सर्व विद्यार्थ्यांनचे, नगराध्यक्ष अनिता येवले, उपनगराध्यक्ष शबाना तडवी, शिक्षणसभापती रंजना भारंबे सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी सौरभ जोशी, प्राचार्य सी. सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे यांनी कौतुक केले, यशस्वीतेसाठी राहुल परदेशी,राहुल धनगर यांनी प्रयत्न केले.