चाळीसगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांना बाजार समितीची संपूर्ण माहिती घरबसल्या ॲपद्वारे मिळावी, या उद्देशाने बाजार समितीने ‘माय एपीएमसी, माझी बाजारसमिती’ ह्या ॲपचे लोकार्पण येथील बाजार समितीत आज करण्यात आले.
चाळीसगाव शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी बाजार समितील बाजारभाव, शेतकरी नोंदणी, बाजारसमिती माहिती, व्यापारी यादी, हवामान अंदाज, हमीभाव यादी, संचालक मंडळ सूची व संपर्क या साऱ्या बाबींची माहिती घरी बसल्या मिळावी या उद्देशाने बाजार समितीने ‘माय एपीएमसी, माझी बाजारसमिती’ ह्या ॲपचे लोकार्पण येथील बाजार समितीत आज करण्यात आले. शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे नियम पाळून यावेळी एॅपचे लोकार्पण करण्यात आले. या ॲपमुळे कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बाजार समितीत नोंदणी करण्यासाठी येण्याची गरज नसणार आहे. त्यामुळे आधुनिकेत भर पडणार आहे. बाजार समितीच्या नूतन प्रशासकांनी अल्पावधीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राबविण्यात येणारे सर्व उपक्रम स्तुत्य राहिले आहेत. असे गौरवोद्गार जेष्ठ मार्गदर्शक प्रदीप देशमुख यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बाजार समितीचे सचिव सतिषराजे पाटील, प्रशासक ईश्वर ठाकरे, अनिल निकम, महेंद्र पाटील, भास्कर पवार, भीमराव खलाने, गोकुळ कोल्हे, नेताजी वाघ, नकुल पाटील, तुकाराम पाटील, दगडू दणके, धर्मा काळे, रमेश सोनागिरे, बापूराव चौधरी, मधुकर कडवे, स्वप्नील कोतकर, कर्मचारी वीरेंद्र पवार, प्रवीण वाघ, ज्ञानेश्वर गायके, प्रशांत मगर आदी उपस्थित होते