पाचोरा प्रतिनिधी । माहेरहुन ५० हजार रुपये आणावे यासाठी तालुक्यातील लासगाव येथील माहेर असलेल्या विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने त्रास असह्य झाल्याने पिडीत महिलेने पाचोरा पोलिसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, लासगांव ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या माधुरी हिचा विवाह नाशिक येथील राकेश दिलीप बडगुजर याचेशी झाला असुन लग्न झाल्या पासुनच माहेरहुन पॅजो रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावे या मागणीसाठी माधुरी हिस सासरच्या मंडळींकडून मारहाण करुन शारिरीक, मानसिक छळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने त्रास असह्य झाल्याने माधुरी हिने दि. १० फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलिसात राकेश दिलीप बडगुजर (पती), दिलीप मोहन बडगुजर (सासरे), केवलबाई दिलीप बडगुजर (सासु) व ज्ञानेश्वर उत्तम बेरडवे (नंदोई) रा. सर्व डॉ. हेडगेवार नगर, त्रिमूर्ती चौक, नाशिक यांचेविरुद्ध गुन्हा नोंदविला असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कॉन्स्टेबल शारदा गोकुळ पाटील ह्या करीत आहे.