जळगाव प्रतिनिधी । लग्नात मानपान आणि खर्च दिला नाही म्हणून विवाहितेसह तिच्या आईवडीलांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, श्रध्दा प्रशांत शेटे रा. निवृत्ती नगर जळगाव यांचा २०१८ मध्ये जळगावातील मुकुंद नगरातील प्रशांत अरूण शेटे यांच्याशी २०१८ मध्ये विवाह झाला. लग्नाच्या सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यांनतर पती प्रशांत शेटे यांने लग्नात मानपान मिळाला नाही यासाठी विवाहितेला टोमणा मारणे सुरू केले. त्यानंतर विवाहितेला तिच्या आईवडीलांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. विवाहिता लग्नापुर्वी एका ठिकाणी नोकरी करत होत्या. नोकरी करत असतांना कमावलेले पैसे आईवडीलांकडून घेवून ये असे सांगून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला. यात पतीसह सासरे अरूण लक्ष्मण शेटे, सासू ललिता अरूण शेटे आणि नणंद प्रियंका तुषार जाधव रा. पुणे यांनी विवाहितेला अश्लिल शिवीगाळ केली. विवाहितेला हा प्रकार असहाय्य झाल्याने त्या माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.