जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुरूनानक नगरातील विवाहितेचा पैश्यांसाठी पतीकडून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सिमा प्रविण शिंदे (वय-३२) रा. गुरूनानक नगर यांचा २००८ मध्ये प्रविण सुनिल शिंदे यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती प्रविण शिंदे यांनी लहान गोष्टींवरून विवाहितेला टॉर्चर करणे सुरू केले. त्यांनतर सासु सुरजबाई सुनिल शिंदे यांच्या सांगण्यावरून पती प्रविण शिंदे यांनी विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. तुझ्या माहेरहून सुटकेस भरून पैसे घेवून ये, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यास सुरूवात केली. सासरे सुनिल मंगल शिंदे, जेठे महेंद्र सुनिल शिंदे, जोगिंदर सुनिल शिंदे, चुलत जेठ बापु विक्रम शिंदे सर्व रा. गुरूनानक नगर जळगाव यांनी शिवीगाळ करत सारखे माहेरहून पैसे आणण्यासाठी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. आपल्यावर होत असलेल्या छळाबाबत पतीसह सहा जणांविरोधात शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.