जळगाव प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावे, यासाठी २१ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार कालिंकामाता परिसरातील ज्ञानेश्वर नगरात समोर आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी रात्री पतीसह १७ जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील माहेर असलेल्या मीना उर्फ राणी गणेश वाघमारे (वय-२१) यांचा विवाह खेडीबुद्रुक ता. जिल्हा जळगाव येथील गणेश तुकाराम वाघमारे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला होता. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर पती गणेश वाघमारे यांनी माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर सासू यांच्यासह माहेरची मंडळी यांनी वेळेवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन पतीला दारून पिऊन आल्यानंतर सांगून मारहाण केली. विवाहितेला हा त्रास सहन न झाल्याने शुक्रवारी २८ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीवरून पती गणेश तुकाराम वाघमारे, सासु अलका तुकाराम वाघमारे दोन्ही रा. सोपानदेव नगर, जळगाव आप्पा महादु वाघमारे, छाया आप्पा वाघमारे, कल्याण महादेव वाघमारे, आशाबाई कल्याण वाघमारे सर्व रा. नेवासा अहमदनगर, ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे, चंद्रकला ज्ञानेश्वर कांबळे, शुभम ज्ञानेश्वर कांबळे, सोनिया ज्ञानेश्वर कांबळे, अशोक लक्ष्मण कांबळे, छाया अशोक कांबळे, शिवानी अशोक कांबळे, शीतल अशोक कांबळे, संजय लक्ष्मण कांबळे, शोभा लक्ष्मण कांबळे आणि स्विटी संजय कांबळे सर्व रा. अहमदनगर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश सपकाळे करीत आहे.