विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

Womane

 

चोपडा(प्रतिनिधी) लग्नात मानपान न केल्याने तसेच माहेरून सोन्याची अंगठी,चैन,एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सासरी नांदत असताना गायत्री शामकांत महाजन (वय २६, रा. गलांगी, ह.मु. गोरगावले ता.चोपडा) यांचा वेळोवेळी शारीरिक छळ करून सोन्याची अंगठी चैन ,व एक लाख रुपयाची मागणी करण्याच्या कारणावरून नवऱ्यासह ,सासू सासरा अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी श्यामकांत वासुदेव महाजन ,चहार्डी ता चोपडा याच्याशी गायत्री महाजन हीचा विवाह झाला होता. परंतु गेल्या एक ते दीड वर्षांपासून लग्नात मानपान न केल्याने विवाहित कडून सोन्याची अंगठी,चैन,एक लाख रुपयांची मागणी करून वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ करण्यात येत होता. पण पीडितेकडून कोणत्याही प्रकारची मागणी पूर्ण होत नाही, म्हणून तिचा मानसिक ,शारीरिक छळ करून तिला त्रास देण्यात येत होता. या जाचास कंटाळून पीडितेच्या फिर्यादीवरून दि 1 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात श्यामकांत वासुदेव महाजन(पती),वासुदेव केशव महाजन(सासरा),मीराबाई वासुदेव महाजन (सासू),कल्पना अमोल चौधरी(नणंद),अमोल शिवदास चौधरी(नंदुई) सर्व. रा.चहार्डी ता. चोपडा यांच्या विरोधात भादवी कलम ४९८(अ),३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. नामदेव महाजन हे करीत आहे.

Add Comment

Protected Content