धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे.
या आंदोलनात पोलीसांच्या मारहाणमुळे अनेक महिला, लहान मुले, पुरूषांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ धरणगाव शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढून तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे व मराठा समाजाला आरक्षण देवून न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मोर्चात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.