Home Cities यावल डॉ.पायल तडवीप्रकरणी फैजपूर येथे मोर्चा

डॉ.पायल तडवीप्रकरणी फैजपूर येथे मोर्चा

f2ab6772 768d 4c8d 962a d5b896326ff3
f2ab6772 768d 4c8d 962a d5b896326ff3

f2ab6772 768d 4c8d 962a d5b896326ff3

फैजपूर (प्रतिनिधी) डॉ.पायल तडवीच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या तिघा तरूणींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज येथील प्रांतकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

 

सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथून मोर्चेला सुरुवात झाली होऊन सुभाष चौक, छत्री चौक यामार्गे मोर्चा प्रांतकार्यालयात पोहोचला. यावेळी प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबाले यांना आदिवासी संघर्ष मोर्चा, मधूस्नेह परिवार खिरोदा व अनिल चौधरी विकास मंचतर्फे मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आ शिरीष चौधरी, भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, आदिवासी एकात्मक विकास अध्यक्ष मिना तडवी, फैजपूर उपनगराध्यक्ष रशीद तडवी, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक कलीम मण्यार, रईस मोमीन, शेख इरफान उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील गुन्हेगार असलेल्यांना डॉक्टरांना बडतर्फे करून महाराष्ट्र मेडीकल कॉन्सीलने तात्काळ या प्रकरणात दोषी असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे, आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचे राजिस्ट्रेशन रद्द करावे.यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, शोएब तडवी, असल्लम तडवी, राजू तडवी, रंजन तडवी, मुनाफ तडवी, जुम्मा तडवी, जावेद तडवी सोयल तडवी, युनूस तडवी यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound