मराठी नववर्षाच्या स्वागताला नागरिक सज्ज – बाजारपेठांनी झटकली मरगळ (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. घरासमोरून डोलदार गुढी उभारून सण साजरा करण्याची परंपरा आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज झाले असून बाजारपेठाही मागील मरगळ झटकून सजल्या आहेत.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या बंधनातपासून मुक्ती मिळाली असून शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने गुढीपाडवा साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे या वर्षाची गुढी ही आनंदाची गुढी राहणार आहे नवीन आशा-आकांक्षा घेऊन येणारा गुढीपाडव्याचा सण यापुढील काळात चांगला असेल अशी आशा नागरिकांसह व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारपेठेत आलेली मरगळ दूर होऊन पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत दिसून येते मोठ्या संख्येने खरेदीसाठी साठी शहरातील लोक बाहेर पडले आहेत.

घरोघरी गुढी पाडवा साजरा करण्यासाठी बाजारामध्ये साखर काठी, रेशीम वस्त्र, हार फुलं, हल्ला कंगण या वस्तूंना मोठी मागणी आहे. साखरेचे भाव साखरेचे भाव वाढले असून त्याचा परिणाम व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या खरेदीवर दिसून येत आहे. साखरेच्या माळा आणि बांबूच्या काठ्या आदींनी साहित्याने बाजारपेठ सजली असून तीस रुपयापासून दिडशे रुपयांपर्यंत  साखरमाळा आणि कंगन उपलब्ध आहे. साखरगाठी बांबू हार फुले यांची रेलचेल असून दरवाढीचा फटका देखील या वर्षी दिसून येत आहे.

मराठी नववर्षाच्या स्वागत करतांना हे नववर्ष सर्वांना सुख, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावोत या लाईव्ह ट्रेंड्स परिवाराकडून आपणास मनःपूर्वक शुभेच्छा..

व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/watch/?v=505062887859814&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

Protected Content