जळगाव, प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालययाच्या आवारात गेल्या वर्षभरात गुन्हेगारी फोफावत असल्याने त्या विरोधात कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यातर्फे सोमवार २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा नेण्यात येणार होता. परंतु, औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे पुण्याप्रताप दयाराम पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
विजय भास्कर पाटील व पियुष पाटील यांच्या विरोधात पुण्याप्रताप दयाराम पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या दोघांविरोधात अनेक पुरावे श्री पाटील यांनी खंडपीठात सदर केले आहेत. खंडपीठाने या पुराव्याची दाखल घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक पोलीस विशेष महानिरीक्षक, नाशिक, पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस निरीक्षक जिल्हा पेठ जळगाव यांना तातडीची करणे दाखवा नोटीस खंडपीठाने बजावली असून दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली असल्याची माहिती अॅड. हेमंत सुर्वे यांनी दिली आहे. यामुळे काही पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी मानद सचिव निलेश भोईटे व संचालक मंडळाशी चर्चा केली असता न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल विचारात घेता विद्यार्थी हित लक्षात घेऊन सोमवारी (२९ जुलै) होणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.