जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलांबाबत अत्यंत अश्लिल लज्जा वाटेल आणि अवमान जनक वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व सहाय्यक फौजदार अशोक महाजन याच्यावर दाखल गुन्ह्यात तातडीने अटक होवून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणी मराठा आत्मसन्मान अभियानच्या वतीने शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, जळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सामाजिक द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक असंतोष निर्माणस करण्यासाठी स्वत:चा पदाचा गैरवापर करून गंभीर वक्तव्य करून समाजाच्या महिलांबाबत अत्यंत अश्लिल लज्जस्पद आणि अवमान जनक वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. यासंदर्भात किरणकुमार बकाले यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. किरणकुमार बकाले यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. परंतू अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आलेली नाही. जळगाव जिल्हा न्यायालयाने बकालेंचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून आज पाच दिवस झाले परंतू अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे किरणकुमार बकाले आणि अशोक महाजन यांना तातडीने अटक करून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावेळी समस्त मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे, शिवाजी जाधव, भास्करराव काळे, संजीव भोर, रोशन मराठे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाईव्ह व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/442756487922701