भुसावळ, प्रतिनिधी | शहर व तालुका मराठा समाजातर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा जवळ रेल्वे स्टेशन भुसावळ येथे साजरी करण्यात आली.
जिजाऊ पूजन करून खिचडी व फळवाटप करण्यात आले. त्यानंतर रेड क्रॉस सोसायटीतर्फे आयोजित रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिर भुसावळ शहर व तालुका मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आले होते. जवळजवळ ५०० नागरिकांना खिचडी व फळ वाटप करण्यात आले. तसेच ५५ रक्तदात्यांनी जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान केले.राजमाता जिजाऊ जयंती ललिता पाटील, अलका भगत, संध्या कंधे, किरण गायकवाड, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, ललित मराठे, मुकेश गुंजाळ, राहुल बोरसे, अॅड. तुषार पाटील, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील, सचिव प्रमोद पाटील, छावा तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे, रवींद्र लेकुरवाळे, ईश्वर पाटील, ईश्वर पवार. सभापती राजेंद्र चौधरी, अॅड. सुशिल बर्वे, नरेंद्र पाटील, अशोक हिंगणे, सुनील बर्गे, सतीश उगले, पवन उगले, मराठा युवक अध्यक्ष गजानन ठाकरे, श्रीकांत बरकले, एकनाथ धांडे, अविनाश गरुड, संजय शिंदे, संजय कदम, आनंद ठाकरे, ज्ञानेश्वर जगदाळे, जितेश पाटील, प्रतीक पाटील, गणेश बावडेकर, शुभम सुरती, लोकेश महाजन, जयेश पाटील, विजय साळुंखे यासह इतर समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात गायत्री जगदाळे या मुलीने तीन बायपास पाच फुटाची जिजाऊ प्रतिमा रांगोळीने साकारली. तिचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. अनुश्री महिला बहु संस्थेतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली त्यांचाही मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत बरकले, सचिव प्रमोद पाटील, सहसचिव योगेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद पाटील, प्रवीण भोसले, हरीश भोसले, रुपेश पाटील, हर्षल रंधे, विजय कलापुरे, रजत शिंदे, प्रशांत संसारे, रवी देवपुजे, पंकज पाटील ,श्रीकांत काकडे, प्रवीण राजपूत यासह इतर समाज बांधवांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. संध्याकाळी तालुक्यातील ग्रामीण भागात जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.