तरडी येथील सरपंचासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तरडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह इतरांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एरंडोल पारोळा तालुक्याचे आ.चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात सुरू असलेला विकासकामांचा धडाका तसेच आ.पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजुआबा पाटील, शेतकी संघाचे चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील, जोगलखेडे येथील अनिल पाटील, तरडी येथील भैय्या पाटील, मुंदाणे प्र.ऊ.येथील एकनाथ पाटील, गणेश मोरे उपस्थित होते.

तसेच तरडी येथील मिराबाई वंजारी, उपसरपंच अंकुश पवार, सदस्य विनोद बल्लु पवार, बारकु भिल, छोटु भिल, गोकुळ पवार, वसंत पवार, उत्तम पवार, सुनिल पवार, ब्रिजलाल पवार, राहुल पवार, सोनु वडर, गणेश पवार, सुरेश पवार, सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

 

Protected Content