अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात शहरातील असंख्य मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे पक्षाला मोठे राजकीय बळ मिळाले आहे. आमदार अनिल पाटील यांनी प्रवेश करणाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

गेल्या आठवड्यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील काही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे अमळनेरच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये काँग्रेस नेते आमीरखा मिस्तरी, हाजी दबिरखा पठाण, माजी नगरसेवक रहेमान मेंबर, निवृत्त नायब तहसीलदार साबीर खान पठाण, तौसिफ हाजी शेखा, जफर मण्यार, साबीर पठाण, कादीर खा पठाण, फरदीन खा आदी मान्यवरांचा समावेश आहे.
या प्रवेश सोहळ्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, आरीफ पठाण, सैय्यद आबीद अली यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे अभिनंदन केले. आ. पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना या निर्णयाचे कौतुक करून शहराचा विकास व समाज बांधवांच्या हितासाठी कटीबद्ध राहण्याची ग्वाही दिली.



