ऑलम्पिक समारोप समारंभात ध्वजवाहक असणार मनू भाकर

पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर भारताची ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, होय मनूची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. तिने चमकदार कामगिरी केली आहे आणि ती या सन्मानास पात्र आहे.

हरियाणातील झज्जर येथील रहिवासी असलेल्या मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनूने महिलांच्या वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूलमध्ये आणि सरबज्योत सिंगसह मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनूचे पदक हुकले. तिने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात चौथे स्थान पटकावले. हंगेरीच्या वेरोनिकासोबत तिसऱ्या क्रमांकासाठी शूटऑफमध्ये पराभूत झाल्यानंतर ती बाहेर पडली. 8 मालिकांमध्ये मनूने 5 पैकी 5 शॉट्स फक्त एकदाच काढले. तिने 40 पैकी 28 शॉट्स केले. यासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक करण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले.

Protected Content