Home क्रीडा नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताच्या मनू आणि सौरभला सुवर्णपदक

नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताच्या मनू आणि सौरभला सुवर्णपदक


manu saurabh
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 10 मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात सुवर्णपदक पटकावले आहे. दरम्यान, ही स्पर्धा चीनमधील बीजिंग येथे सुरु आहे.

 

 

मनू आणि सौरभ या दोघांनी यापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही नेत्रदीपक कामगिरी केली होती. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत 16-6 असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी भारताच्या अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound