जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात नवीपेठेत मनोमय इलेक्ट्रॉनिक्स या चार मजली अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणार्या दालनात विविध उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
जळगावकरांच्या सेवेत ५ जानेवारी २०१८ रोजी मनोमय इलेक्ट्रॉनिक्स रूजू झाले होते. एक वर्षाच्या कालखंडात या दालनाला जळगावकर नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. यात टिव्ही, फ्रिज, साऊंड सिस्टीम्स आदींपासून ते विविध गृहोपयोगी उपकरणे उपलब्ध आहेत. यात सॅमसंग, सोनी, व्हर्लपुल, पॅनासोनिक, बॉश आदींसारख्या ख्यातप्राप्त कंपन्यांच्या उपकरणांचा समावेश आहे. हे दालन चार मजली असून येथे ग्राहकांना कोणतेही उपकरण खरेदी करण्यापूर्वी त्यांचा परिपूर्ण वापर जाणून घेता येतो. अर्थात, घरी उपकरण नेण्याआधी त्याचे सर्व फंक्शन्स जाणून घेता येतात. यामुळे ग्राहकाला आपण खरेदी करणार्या प्रॉडक्टची अगदी परिपूर्ण पध्दतीत माहिती मिळते. येथे सुटसुटीत जागा असल्यामुळे ग्राहकांना अडचण येत नाही. तर संचालकांसह सर्व कर्मचारी हे ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. गत वर्षभरात मनोमय इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध कंपन्या आणि अॅफिलीयेट पार्टनर्सच्या मदतीने ग्राहकांसाठी योजना राबविण्यात आल्या असून याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सध्या येथे बजाज फिनसर्व्ह कंपनीचा इएमआय फेस्टीव्हल सुरू आहे.
मनोमय इलेक्ट्रॉनिक्सच्या वाटचालीबाबत या दालनाचे संचालक प्रतिकेश काबरा यांनी माहिती दिली. सोबत बजाज फिनसर्व्हचे स्थानिक व्यवस्थापक युवराज पाटील यांनी इएमआय फेस्टीव्हलबाबत माहिती दिली. या माहितीला आपण सोबतच्या व्हिडीओवर क्लिक करून जाणून घेऊ शकतात.
पहा- मनोमय इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मनोज काबरा, प्रतिकेश काबरा व बजाज फिनसर्व्हचे युवराज पाटील यांनी दिलेली माहिती.
मनोमय इलेक्ट्रॉनिक्सचे अचूक लोकेशन–