मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा आदेश दिला. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. भाजप आमदार आशीष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली होती.

मनोज जरांगे यांच्याशी माझे काही घेणं-देणं नाही. मात्र त्यांचा बोलवता धनी कोण हे मी शोधणारच असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला याविषयी बोलायचे नव्हते पण मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले ते हायकोर्टात टिकले, मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन कुणी पेटवले असे सवाल उपस्थित केला

 

 

Protected Content