रावेर-शालीक महाजन ( Exclusive ) | आधीच रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार असतांना आता माजी आमदार मनीषदादा जैन यांनी देखील आपण येथून निवडणूक लढविणार असल्याचे घोषीत केल्याने येथील लढत रंगतदार होऊ शकते.
रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास नक्की पूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरणार असल्याचे प्रतिपादन आज माजी आमदार मनीषदादा जैन यांनी केले आहे. अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्त ते ना. अनिल पाटील यांच्या सोबत रावेर तालुक्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली.
हे देखील पहा : अजितादादा म्हणजे चॉकलेट न देता काम करणारा नेता : मनीष जैन
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीला मोठी चुरस राहील असे आतापासूनच दिसून येत आहे. गेल्या जवळपास ३० वर्षांमध्ये येथून सातत्याने प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलत असल्याचे चित्र दिसून आले आहे. यातच पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने अनेकांनी आता पासुनच मोर्चाबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता मनीष जैन यांची भर पडली आहे.
अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानी निमित्त कॅबेनेट मंत्री अनिल पाटील रावेर दौर्यावर होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार मनिष जैन देखील होते.त्यांना निवडणूक संदर्भात पत्रकारांनी विचारले असता.रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी असल्याचे जैन यांनी सांगितले.येथील जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला सुटणार असल्याचे बोलले जात आहे.तर इकडे मंत्री अनिल पाटील म्हणाले आम्ही माजी आमदार अरुण पाटील यांच्या देखील संपर्कात आहे.त्यांच्याशी आमचे बोलणे सुरु असून लवकरच तुम्हाला मोठी बातमी मिळेल असे सांगुण निघुन गेले. तर मनीष जैन यांनी स्वत: येथून उतरणार असल्याचे सांगितले आहे.
यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. कुंदन फेगडे, नंदू महाजन आदींची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. कॉंग्रेसच्या वतीने शिरीषदादा अथवा त्यांचे पुत्र धनंजय चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहेत. याच्या जोडीला आता मनीष जैन यांनी देखील इच्छा व्यक्त केल्याने येथील लढत ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.