जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेहरुण येथील रामेश्वर कॉलनीत कार्यरत असलेल्या विचार वारसा फाउंडेशन गणेश मंडळाची वार्षिक बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंडळाच्या २०२5च्या गणेशोत्सवासाठी नवी कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व सदस्यांच्या सहमतीने मनिष चौधरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सचिवपदाची जबाबदारी गितेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आली. उपाध्यक्षपदी ऋषिकेश राजपूत यांची निवड करण्यात आली असून संकेत म्हस्कर यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय खजिनदारपदी अविनाश पाटील आणि गौरव डांगे यांची नियुक्ती करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव देखील दिमाखात आणि सामाजिक एकोपा वाढवणाऱ्या उपक्रमांनी सजलेला असणार आहे. बैठकीत गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विविध सांस्कृतिक, सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. यासाठी आधीच प्राथमिक नियोजन सुरू करण्यात आले असून, संपूर्ण उत्सवाचे सुसूत्र नियोजन होण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात यंदा एक अभिनव आणि वेगळा देखावा उभारण्यात येणार आहे, असे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. या देखाव्यासाठी विशेष सजावटीचे साहित्य आणि स्थानिक कलाकारांचा सहभाग देखील सुनिश्चित केला जाणार आहे.
मंडळाच्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून निखिल शेलार, आकाश तोमर, अमोल ढाकणे, चेतन राजपूत, अक्षय गवई, अमोल पनाड, अजय मांडोळे, प्रशांत सोनवणे, हर्षल जाधव, प्रफुल सूर्यवंशी, मयूर सावकारे, कुणाल जुमडे, योगेश धनगर, कुणाल सोनार यांचा समावेश आहे. सल्लागार मंडळात आशिष राजपूत, मयूर डांगे आणि अभिजित राजपूत यांचा समावेश करण्यात आला आहे.
बैठकीच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि उत्सवापूर्व उत्सवाच्या रंगात रंगलेले होते.



