खांद्यावर घेत तरूणांनी काढली मंगेश चव्हाणांची मिरवणूक (व्हिडीओ)

mangesh chavhan chalisgaon news

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण याचा आजचा प्रचार दौरा बेलगंगा, डोनदिगर, डोन पिंपरी, माळशेवगे या भागात झाला. प्रत्येक गावात मंगेश चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तरूणांनी त्यांना खांद्यावर घेत मिरवणूक काढली.

तालुक्यातील बेलगंगा, डोनदिगर, डोन पिंपरी, माळशेवगे या गावांमध्ये मंगेश चव्हाण यांना मतदारांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक गावातून अक्षरशा कार्यकर्ते मतदारांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली व ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण करून तर पुरुषांनी गुलाल उधळून मंगेश चव्हाण यांच्या नावाचा जयघोष करीत विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी मंगेश चव्हाण यांनी तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून तुमचा भाऊ सहकारी मित्र मुलगा म्हणून मला साथ द्या आणि सेवेची संधी द्या असे आवाहन सर्व मतदार बंधू-भगिनींना केला.

Protected Content