५0 हजाराच्या मताधिक्याने मंगेश चव्हाण विजयी होणार – गिरीश महाजन

 

girish mahajan jalgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात जी विकासाची गंगा आणली गेली आहे, त्यातून करोडो रुपयांचा निधी खर्च झाला आहे. चाळीसगाव मतदार संघात देखील कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. याच विकासकामांवर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना 50 हजार मताधिक्‍याने विजयी होणार असल्याचा विश्वास जलसंपदामंत्री व भाजपाचे संकट मोचक म्हणून ख्याती असलेले गिरीश महाजन यांनी आज व्यक्त केला.

राज्याचे जलसंपदा मंत्री व संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज चाळीसगाव धावती भेट दिली असतांना राजपूत मंगल कार्यालयात तालुक्यातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, गटप्रमुख, शक्ती केंद्र व बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यकर्त्यांनी सर्व गट-तट बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. सर्वसामान्य घटकातील शेवटचा नागरिकापर्यंत अनेक विविध कल्याणकारी योजना राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमाने राबविण्यात आलेले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील वरखेड या धरणाचा प्रश्न या शासनाच्या काळात मार्गी लागला असून वर्षभरात तो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. तसेच जळगाव-चाळीसगाव-चांदवडचा महामार्ग काँक्रिटीकरण रस्ता असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा प्रश्न असेल गणित नगरीचा प्रश्न असेल, यासह असंख्य विविध विकास कामे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने केली असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदान कसे करता येईल, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे असून राज्यात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करून घेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

याचबरोबर, यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, दिनेश बोरसे व आपल्या मनोगतात पक्षाने आत्तापर्यंत तालुक्यासाठी प्रामाणिक पणे काम केले आहे. जनतेला गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेला विकास दिसत आहे. त्यामुळे याच बळावर यंदादेखील जनता भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सरकार आणण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्क्याने मंगेश चव्हाण यांना विजयी करतील. व हा विकास रथ कायमस्वरूपी पुढे नेण्यासाठी आपल्या पाठीशी राहील, आम्ही देखील या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी मंचावर जळगाव लोकसभेचे खा.उन्मेश पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, जि.प. सभापती पोपटतात्या भोळे, मार्केट सभापती रविंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद जी. खरात, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना मार्केट उपसभापती महेंद्र पाटील, शिवसेना शहरप्रमुख नाना कुमावत, जेष्ठ नेते प्रितमदास रावलानी, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, तुकाराम कोळी, पं.स.सभापती दिनेश बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय भास्करराव पाटील, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, प्रदेश पदाधिकारी सतीश दराडे भाजपचे सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष, सर्व आजी-माजी जि.प. व पं.स. सदस्य, नगरसेवक, मार्केट कमिटी संचालक, भाजपा-सेना महायुतीचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content