के.के. ऊर्दू हायस्कूल व ज्यू कॉलेजमध्ये “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात

k.k.clg

जळगाव प्रतिनिधी । शहरातील के.के.ऊदू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.15 ऑक्टोबर रोजी “वाचन प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थींनीनी व.वा. जिल्हा वाचनालयास भेट दिली.

व.वा. जिल्हा वाचनालयाचे ग्रंथालय प्रमुख अनिल अत्रे यांनी ग्रंथालयाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती दिली. तर शालेय वर्षभरात सर्वात जास्त पुस्तके वाचून वाचन संस्कृतीला जोपासणा-या विद्यार्थ्यास सबा फारुक तेली, अदीबा नाज जूनेद शेख आणि महेविश अताउललाह शाह यांना “रिडर ऑफ इयर 2019” चे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तसेच परिक्षा संपल्यानंतर एक तास आपल्या वर्गात वर्गशिक्षक समवेत आपल्या आवडीचे तास भर मुक्त वाचन केले जाते. उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयास पुस्तके भेट म्हणून दिली. विद्यार्थींनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती आपल्या मनोगतातून सादर केली. विद्यालयाचे प्रा.शमीम मलीक यांनी वाचन संस्कृती जोपासने व मोबाईल आणि सोशल मिडिया पासून दूर कसे रहावे, याविषयी मार्गदर्शन केले. अकिल खान, शकीला शेख, मुश्ताक भिसती, असमा शेख, फयाज शेख यांच्या सोबत ग्रंथालय सेविका तेहमीन शेख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Protected Content