चाळीसगाव,प्रतिनिधी | येथील युवा नेते मंगेश चव्हाण यांच्यातर्फे काल (दि.३) तालुक्यातील बाणगाव आणि खेर्डे येथून २५ वृद्ध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नंदुरबार येथे रवाना करण्यात आले आहे.
नंदुरबार येथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्याचा सगळा खर्च मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे करण्यात येणार आहे. याचप्रकारे आणखी बऱ्याच गरजू वृद्ध व्यक्तींना २५-२५ च्या गटाने यापुढेही टप्प्या-टप्प्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे गरीब गरजू रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.