चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपरखेड येथून तरवाडे गावापर्यंत काढण्यात येणाऱ्या साई पालखी पायी दिंडीस तालुक्याचे युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आज सकाळी तालुक्यातील शिवापूर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते साई पालखीचे पूजन करण्यात आले.
युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर दिंडी पुढे मार्गस्थ झाली. दिंडीने प्रस्थान केल्यानंतर युवा नेते मंगेश चव्हाण यांनी ग्रामस्थांसमवेत एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, “आपण साई बाबांकडे इडा- पिडा टळू दे, आणि बळीराजाचे राज्य येऊ दे, अशी मागणी मागितली आहे. याशिवाय शिवापुर हे गाव अध्यात्मिक असून या गावाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी भविष्यात जीव तोडून प्रयत्न करीन असेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. येत्या वर्षभरात गावाचे किमान दोन प्रश्न तरी मी मार्गी लावेन, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या समवेत भाजपाचे तालुका सरचिटणीस सुनील निकम चाळीसगाव चे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी रोहिणी गावाचे सरपंच अनिल नागरे पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पाटे व विजय कदम हे मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला शिवापूर गावाचे सरपंच केशव पवार, ग्रामपंचायत सदस्य हरीश घाडगे, नंदू घाडगे, कैलास घाडगे, दिलीप घाडगे, पोलीस पाटील नामदेव गोपाळ, सोसायटीचे चेअरमन अण्णा देशमुख, मंदिराचे महाराज दिलीप राजपूत, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.