चाळीसगावातून भाजपचे मंगेश चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत मारली बाजी

mangesh chavhan 2

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण हे अटीतटीच्या लढतीत ४१०० मतांनी विजयी झाले आहेत.

 

त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राजीव देशमुख यांना ८०९६९ मते मिळाली तर मंगेश चव्हाण यांना ८५०६९ मते पडली. येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोरसिंग राठोड यांनी चांगलेच आव्हान निर्माण करीत ३८३६० मते घेतली. त्यामुळे ही लढत अधिक चुरशीची झाली. अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांना मात्र केवळ ४५२२ मते मिळाली.

Protected Content