चाळीसगाव प्रतिनिधी । मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे एकदंत गणेश महोत्सवानिमित्त गरबा वर्कशॉप आणि गरबा स्पर्धेचे आज दि. ६ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आज गरबा वर्कशॉपचे आयोजन दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे. तर गरबा स्पर्धा सायंकाळी 6 वाजता घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या वर्कशॉप आणि स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंगेश चव्हाण मित्र परिवा-याच्या वतीने करण्यात आले आहे.