Home Cities चाळीसगाव मंगेश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणा : चंद्रात्रे यांचे आवाहन

मंगेश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणा : चंद्रात्रे यांचे आवाहन


download 1

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील मतदार संघातील भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचे आवाहन येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत चंद्रात्रे यांनी आज एका पत्रकाद्वारे केले आहे.

 

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. आताही पक्षाने बऱ्याच विचार विनिमयानंतर मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली असून आता उमेदवारीसाठी त्यांच्या स्पर्धेत असलेले इच्छुक त्यांचे समर्थक ठरणार आहेताहेत. त्यामुळे यावेळी आपण त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound