चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यात भाजपा शासनाच्या काळात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा, महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता तालुक्यात पुन्हा कमळ फुलणार असा निर्धार जनसामान्यांनी केला आहे. मंगेश चव्हाण यांच्या वागणूक आणि साधेपणामुळे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुकलीचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. तालुक्यातील पिंपरखेड गाव, शिवापूर, चंदिकावाडी, पाटणा, वलाठान, गोरखपूर, करगाव १,२,३,४ तांडा व गाव, वाडगाव लांबे, राजमाने, कळमडू, अभोणे गाव, अभोणे तांडा, कुंझर, तळेगाव, कृष्णापुरी तांडा, राजदेहरे, राजदेहरे तांडा, तुका तांडा यांसारख्या आदी गावांमध्ये मंगेश चव्हाण यांनी मतदार राजाची भेट घेतली.
प्रचार दौऱ्यात यांनी घेतला सहभाग
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र वाडीलाल राठोड, पं.स.सभापती दिनेश बोरसे, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, मार्केट संचालक मच्छिंद्र राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, उपसभापती संजय पाटील, माजी पं.स. सदस्य सतीश पाटे, संगांनियो सदस्य दिनकर राठोड, सरचिटणीस अनिल नागरे, सांगवीचे सरपंच डॉ.महेंद्र राठोड, तळेगाव सरपंच संतोष राठोड, महिला आघाडी अध्यक्षा नमोताई राठोड, तळेगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते सुभाष शेलार, महेश शिंदे, चेतन देशमुख, पाटणा येथील नितीन पाटील, उमेश आव्हाड, ज्ञानेश्वर बागुल यांच्यासह भाजपाचे शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगेश चव्हाण यांनी प्रचारादरम्यान सांगितले की, भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामामुळे जनता समाधानी आहे. याची प्रचिती प्रत्येक गावात मिळणारा प्रतिसाद पाहून होत आहे. भारतीय जनता पक्षाला जनतेची मिळणारी भरभरून साथ पाहता विरोधकांना आपला पराभव आत्ताच दिसत आहे. कारण जनता आता विकास करणाऱ्या पक्षाच्या माघे उभी आहे. तालुक्यात घराणेशाही निर्माण करणाऱ्याच्या नाही. जनतेचा मनात जो विकास अपेक्षित आहे तोच विकास आपण तालुक्यात घडवून आणू. यासाठी तुम्ही मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी मतदार राजाला केले. मंगेश चव्हाण यांची प्रत्येक गावात विजयाचा फेटा घालून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
बाल गोपलांचा कॅडबरी मॅन
मंगेश चव्हाण यांच्या प्रत्येक गावात जनतेच्या गर्दी सोबतच बाल गोपलांची गर्दी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. बाल गोपलांना आपल्या प्रत्येक भेटीत कॅडबरी देऊन त्यांच्यात रमणाऱ्या मंगेश चव्हाण यांना आता बाल गोपलांनी आपला लाडका “कॅडबरी मॅन” संबोधले आहे.