जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हनुमान कॉलनी परिसरात रस्त्याने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील ७४ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सोमवारी २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, रुची लक्ष्मी काबरा (वय- ४५, रा. अभियंता कॉलनी) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २९ जानेवारी रोजी ८ वाजता रूची काबरा या महिला शहरातील हनुमान कॉलनी परिसरातून पायी जात असतांना त्या वेळी दुचाकीवरून दोन जण आले व त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ओढून नेला. ही घटना घडल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही अज्ञात भामटे सोन्याचे मंगळसुत्र घेवून पसार झाले होते. त्यानी लागलीच नजीकच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दुचाकीवरील अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिलास गभाले करत आहेत.