ना. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मनेश तडवी यांना आदर्श अधीक्षक पुरस्कार प्रदान

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय यांच्या मार्फत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लालमातीचे मुख्याध्यापक तथा अधीक्षक मनेश तडवी यांना आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आदर्श अधिक्षक हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 

मनेश तडवी  यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच शिक्षणाच्या माध्यमातुन केलेले सामाजिक कार्य, प्रशासकीय सेवेतील कार्य व कर्मचाऱ्यांचे दृष्टीने केलेले विविध कार्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेली विविध उपक्रमांची प्रशासकीय पातळीवर दखल घेत जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी त्यांचे नांवाची आदर्श अधीक्षक पुरस्कार या सन्मानासाठी प्रस्तावीत केले होते. आज शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी जळगाव येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या आदिवासी विकास मंत्री ना . विजयकुमार गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.   या कार्यक्रमात रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष  चौधरी, आमदार लताताई सोनवणे, आदिवासी विकास आयुक्त नाशिक हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास अप्पर आयुक्त नासिक संदीप गोलाईत व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. विजय माहेश्वरी तसेच अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास मंडळ नाशिक  व्ही. ए. पाटील, प्रकल्प अधिकारी वनित सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर संस्था चालक तसेच विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातील आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक गृहपाल व कर्मचारी यांच्या उपस्थित आदर्श अधिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

Protected Content