जळगावात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, विविध उपक्रमांसह जयंतीचा उत्साह ! (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज । अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे  शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती क्रीडा संकुलापासून शिवपुजनाने  रॅली काढण्यात आली. या रॅलीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी सहभाग नोंदविला होता.

 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या शिवजयंती साजरी करण्यात आलेले नव्हते. दरम्यान, यंदा कोरोनाचे सावट कमी असल्याने कोरोनाचे नियम पाळत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली होती. शहरातील सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने जळगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. महिला व पुरुष पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमपासून सकाळी ९ वाजता शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे शिवतिर्थ मैदानापर्यंत रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मिरवणूकीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर भगवेमय झाले होते.

 

या भव्य मिरवणुकीत शिवजन्मोत्सवाचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. सोबतच या मिरवणुकीत आकर्षक सजीव देखावे, ढोल-ताशाचा गजर यावेळी करण्यात आला होता. या वेळी सर्वत्र तरुणांच्या हातात व वाहनांवर भगवे ध्वज फडकत असल्याने शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते.

 

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, आमदार राजूमामा भोळे, भाजपा शहराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, विनोद देशमुख, आश्विनी देशमुख, सरीता माळी-कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडीचे महानगराध्यक्ष मंगला पाटील, मुविको राज कोल्हे, मनिषा पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अयाज मलिक यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हापेठ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Protected Content